Headlines

कौस्तुभ कदम यांना युवा कला गौरव सन्मान पुरस्कार जाहीर

*⚡मालवण ता.२१-:* आर्टस् बिट्स फाउंडेशन, पुणे या संस्थेतर्फे दिला जाणारा युवा कला गौरव सन्मान पुरस्कार मूळ मालवण खैदा कातवड येथील व सध्या मुंबई ठाणे येथे राहत असलेले फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कौस्तुभ कमलाकर कदम यांना जाहीर झाला आहे. कौस्तुभ कदम यांना बालपणापासून फोटोग्राफीची आवड होती.हीच आवड त्यांना युवा कला गौरव सन्मानासपात्र ठरवून गेली. गेली सात ते आठ वर्षे त्यांनी फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निसर्गाच्या विविध छटा आपल्या कॅमेऱ्यात टिपण हा त्यांचा आवडीचा छंद आहे. त्याच बरोबर करीयर म्हणून या फोटोग्राफी क्षेत्रात मुंबई ठाणे सारख्या मोठ्या क्षेत्रात त्यांनी आपल्या यशाची मुहूर्तमेढ गेल्या सात वर्षा पूर्वी रोवली आहे.विविध समारंभ सोहळयात ते आवर्जून आपल्या फोटोग्राफीची कला दाखवत आहेत. विवाह सोहळ्यातील फोटोग्राफी,डान्स,भरतनाट्यम,कथ्थक सोहळा कार्यक्रम, निसर्गसौंदर्य फोटो यासारख्या फोटोग्राफी मुळे त्याच्या कलागुणांचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page