फोडा येथे लाकडाने भरलेला ट्रकसह 7 लाख 65 हजार चा मुद्देमाल जप्त
*⚡कणकवली ता.२१-:* फोंडा दाजीपूर रस्तावर आकेशीय जातीचे अवैध लाकूड वाहतूक करत असताना फोंडा येथे ट्रक व लाकूड असा तब्बल 7 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रशांत नामदेव राणे रा.भैरिबांबर ता राधानगरी व अमर बळवंत शिंदे रा.ठिपकुर्ली ता. राधानगरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपवनसंरक्षक नारनवर, सहा वनसंरक्षक सावंतवाडी जलगावकर वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना होत असलेल्याआकेशीय लाकूड वाहतुकीला फोडा येथे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर वनपाल अनिल जाधव वनरक्षक शेगावे वनरक्षक सुतार वनरक्षक मणेर वनरक्षक अनिल राख यांनी रात्रीची गस्त घालत असताना दिनांक 20 /09/2021 रोजी रात्री फोंडा दाजीपूर रस्तावर आकेशीय जातीचे अवैध लाकूड वाहतूक करत असताना फोंडा येथे ट्रक व लाकूड असा तब्बल 7 लाख 65 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रशांत नामदेव राणे रा.भैरिबांबर ता राधानगरी व अमर बळवंत शिंदे रा.ठिपकुर्ली ता राधानगरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक क्र. MH 10 – z-0631मधून आकेशीय लाकडाची विनापरवाना वाहतूक होत होती. 20सप्टेंबर रोजी वनविभागाचे पथक वनक्षेत्रपाल यांचे समावेत रात्रीची गस्त घालत असताना रात्रीचे वेळी सदर ट्रक जप्त करून आतील लाकडासह ट्रक वनविभागाच्या फोंडाघाट येथील विक्री आगारात आणण्यात आला. यावेळी 7 लाख रुपये किंमतीचा टेम्पो व 65000 हजार रुपये किमतीचे लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर व वनपाल अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अधिक तपास फोंडा वनपाल अनिल जाधव करत आहेत
