Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 433.9820 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.01 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 53 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 84.7070, अरुणा – 78.2893, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…

Read More

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 48.55 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3849.4825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 67(3744), सावंतवाडी – 40(4145.1), वेंगुर्ला…

Read More

स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत अभिप्राय नोंदवा

सीईओ प्रजित नायर यांचे आवाहन *⚡ओरोस ता.२९-:* स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली  यांनी दिलेल्या सुचनेनुसार राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत सन 2021-22 करीता राज्यातील ग्रामिण भागात स्वच्छ सर्वेक्षण सुरु करण्यात आले  असुन या सर्वेक्षणात लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण…

Read More

स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी आ. केसरकर घालत आहेत अम्युझमेंट पार्क प्रकल्पाचा घाट

भाजप तालुकाध्यक्ष प्रविण गवस यांचा आरोप *दोडामार्ग / प्रतिनिधी* तिलारी धरणग्रस्त शेतकरी यांच्या जमिनी कवडीमोलाने शासनाने धरण बांधण्यासाठी संपादित केल्या होत्या, चांगल्या जमीनी घेऊन स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले,त्यांचे पुनवर्सन व अन्य मागण्या पूर्ण केल्या नाहीत.अद्यापही काही पुनवर्सन गावठाणातील पायाभूत मूलभूत सुविधा पूर्ण करून देण्यास आमदार दिपकभाई केसरकर शासन दरबारी कमी पडत आहेत.पुनर्वसन गावठणांना मुख्य जोड…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे सफाई कामगारांचा सन्मान

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* कोरोना महामारीच्या काळात न डगमगता, स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत सेवा देणा-या नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगारांना २२ सप्टेंबर रोजी रेनकोट देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, स्वच्छता सदेश दूत सुनिल नांदोस्कर, गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नायब तहसिलदार नागेश शिदे, मंडळ अधिकारी बी.सी.चव्हाण, तलाठी सज्जा डी.बी.गोरड, उज्वला…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* केंद्र शासनामार्फत सन २०२१-२२ हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्याचे आदेश नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ‘आझादीका अमृत महोत्सव‘ (ऋृख़्त्र*ृग्) ही स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दि.२६ जुलै ते दि.२ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. कचरा वर्गीकरण जनजागृती…

Read More

देव्या सूर्याजी, मंगेश तळवणेकर यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

जेष्ठ नागरिक संघाने केले जाहीर *⚡सावंतवाडी ता.२८-:* ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून देण्यात येणारा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार यावर्षी सामाजिक कार्यकर्ते श्री. दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी आणि श्री. मंगेश तळवणेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक १ ऑक्टोंबर रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Read More

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचारी सोसायटीच्या वतीने ई पीक पाहणी कार्यशाळा संपन्न

वैभववाडी प्रतिनिधी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीच्या वतीने सोमवारी ई पीक पाहणी कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यशाळेसाठी वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार श्री. रामदास झळके, नायब तहसीलदार श्री. नाईक ,निवडू नायब तहसीलदार सौ. कासकर मॅडम व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे मार्गदर्शन वैभववाडी वाभवे गावचे तलाठी बागल यांनी केले….

Read More

राज्यस्तरीय जीत क्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्यानी पटकावले सुवर्णपदक

नॅशनल जीत क्वांदो स्पर्धेत झाली दोघांची निवड. *⚡देवगड ता.२८-:* पंढरपुर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जीत क्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्या कु. दीक्षा चंद्रकांत पारकर, कु जान्हवी नागेश बाक्रे यांनी अप्रतिम कामगिरी करत दोघींनीही गोल्ड मेडल मिळवले तसेच पुढील महिन्यात जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या नॅशनल जीत क्वांदो स्पर्धेसाठी दोघांचीही निवड झाली आहे. वरेरी येथील प्रतिथयश आंबा…

Read More

मनसेने केले सीईओ प्रजित नायर यांचे अभिनंदन

कोरोना लसीकरणात जिल्हा अव्वल असल्याचे निमित्त *⚡सिंधुदुर्गनगरी ता २८-:* कोरोना आपत्कालिन परिस्थिती व त्यानंतरच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या दरम्यान शासनाकडून चालू करण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान प्राप्त केल्याने मनसेच्या वतीने प्रसाद गावडे यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजित नायर यांची भेट घेत पुष्पगुच्छ व अभिनंदन पत्र देऊन अभिनंदन केले ….

Read More
You cannot copy content of this page