वैभववाडी प्रतिनिधी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीच्या वतीने सोमवारी ई पीक पाहणी कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यशाळेसाठी वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार श्री. रामदास झळके, नायब तहसीलदार श्री. नाईक ,निवडू नायब तहसीलदार सौ. कासकर मॅडम व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या कार्यशाळेचे मार्गदर्शन वैभववाडी वाभवे गावचे तलाठी बागल यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काकडे सर उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी कशी करावी व आपल्या सातबारा वरती आपल्या शेतीची नोंद कशी घ्यावी यासंबंधी योग्य व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. हे सर्व विद्यार्थी आपल्या गावात जाऊन या संबंधी जनजागृती करणार आहेत. सोसायटी अध्यक्ष बाळाजी रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन सोसायटीचे सचिव मयुरी पेडणेकर यांनी केले. सदर कार्यशाळेसाठी 50 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचारी सोसायटीच्या वतीने ई पीक पाहणी कार्यशाळा संपन्न
