कोरोना लसीकरणात जिल्हा अव्वल असल्याचे निमित्त
*⚡सिंधुदुर्गनगरी ता २८-:* कोरोना आपत्कालिन परिस्थिती व त्यानंतरच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना या दरम्यान शासनाकडून चालू करण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान प्राप्त केल्याने मनसेच्या वतीने प्रसाद गावडे यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजित नायर यांची भेट घेत पुष्पगुच्छ व अभिनंदन पत्र देऊन अभिनंदन केले . सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेने कोविड परिस्थितीत सुनियोजित पद्धतीने सर्व यंत्रणा हाताळून जास्तीत जास्त प्रमाणात सामान्य जनतेपर्यंत लसीकरणाचा लाभ पोहचण्यासाठी विशेष कटाक्षपूर्वक लक्ष दिले. व जिल्ह्यात गावागावात वाडीवस्त्यांवर लसीकरण कार्यक्रम आयोजित केल्यामुळेच लसीकरण मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्हा अग्रक्रमांकावर आला आहे. अशी भावना मनसेने व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, संदेश कांबळे यांच्यासह या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,रामा सावंत व अमोल जंगले आदी पदाधिकरी उपस्थित होते.
