जिल्ह्यात इकॉलॉजीकल टास्क फोर्स स्थापन करणार
ब्रिगे सुधीर सावंत:जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांच्याशी केली चर्चा *⚡ओरोस ता.३०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी हतबल होत असून शेतीकडे पाठ फिरवत आहेत. हत्त्ती, डुक्कर, माकड, गवारेडे, वनगाय, शेकरू इत्यादी प्रकारचे वन्य प्राणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून हे प्राणी सध्या जंगल भाग सोडून गावातील लोकवस्ती…
