दोडामार्ग तहसील कार्यालयात दुर्गंधीचे साम्राज्य

स्वच्छ भारत अभियान दिखाव्यापुरतेच : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

*⚡दोडामार्ग ता.३०-: सुमित दळवी* देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियान चालू आहे. मात्र ते दिखाव्यापुरतेच आहे असच म्हणावं लागेल. लोकांचे जीवन आरोग्य सुदृढ करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असतानाच दोडामार्ग तहसील कार्यालयात मात्र शौचालयात तसेच आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत तीन तेरा वाजले आहेत. तहसीलदार कार्यालयात रोज दीड ते दोन हजार लोक कामानिमित्त येत असतात, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी काही वेळ त्यांना थांबावं लागत परंतु स्वच्छतागृहच मुळात स्वच्छ नसल्यामुळे नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होत आहे, नागरिकांना नाक बंद करून कार्यालयात वावरावे लागत आहे. या कार्यालयाच्या आवारातच कृषी ऑफिस पोलिस ठाणे, भुमी अभिलेख कार्यालय आधारकार्ड केंद्र आहे,येथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांसाठी स्वच्छतागृहे आहेत परंतु तेथे घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळते.मुळात या परिसरात स्वच्छता होते की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी अशा या अस्वच्छतेमुळे लोकांचे आरोग्य मात्र धोक्यात येणार आहे.

You cannot copy content of this page