ह्युमन राईट असोसिएशन फोर प्रोटेक्शनची 3 रोजी कणकवलीत मार्गदर्शनपर कार्यशाळा

*⚡कणकवली ता.३०-:* ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत कणकवली येथे मानवी हक्क, कर्तव्य अधिकार व अंमलबजावणी या विषयाची कार्यशाळा आयोजित केली आहे. जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेला खालील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. चौधरी,राष्ट्रीय सचिव डॉ.जावेद शिकलगार,राष्ट्रीय प्रवक्ते संतोष कदम ,राष्ट्रीय कायदेविषयक सल्लागार अँड. अनिल कुमार जाधव. .महाराष्ट्र राज्य निरीक्षक. घनश्याम सांडीम उपस्थित राहणार आहे. -मातोश्री मंगल कार्यालय कणकवली, डॉक्टर नवरे हॉस्पिटल समोर सकाळी 10 ते दुपारी 2.या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर व कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनिफ पिरखान यांनी केले आहे.

You cannot copy content of this page