कळणे नुकसानग्रस्त शेतकरी १३ ऑक्टोंबरला करणार तीव्र आंदोलन
*दोडामार्ग / सुमित दळवी* कळणे खनिज प्रकल्पाची दुर्घटना २९ जुलै रोजी घडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेले आंदोलन हे तीव्र स्वरुपाचे होणार असल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी अभय देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते पुढे म्हणाले, कळणे येथील नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबासह प्रांत कार्यालय सावंतवाडी येथे धडक देणार आहेत. कारण पंचनाम्यानुसार मंजूर रकमेची…
