वाघ म्हणायचे आणि कोल्ह्यासारखे पळायचे

दोन दिवसांच्या अधिवेशनावरुन नारायण राणेंची आघाडी सरकारवर गंभीर टिका

*💫ओरोस दि.०५-:* पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेतले जात आहे. अधिवेशन पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित न राहून परंपरा मोडली आहे. त्यामुळे हे उद्धव ठाकरे सरकार राज्यातील जनतेच्या भल्यासाठी नसून स्वतःची कामे करून घेण्यासाठी हे सरकार आहे. एकीकडे स्वतःला वाघ म्हणायचे आणि दूसरीकडे कोल्ह्याप्रमाणे पळून जायचे, असा प्रकार असल्याची घणाघाती टीका भाजप नेते खा नारायण राणेंनी आघाडी सरकारवर केली आहे. येथील पडवेमधील मेडिकल कॉलेजमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद गटनेते रणजीत देसाई उपस्थित होते. पुढे बोलताना खा राणेंनी राज्यातील आघाडी सरकारने ५ व ६ रोजी पावसाळी अधिवेशन बोलाविले आहे. कोरोनाचे कारण सांगत दोन दिवस अधिवेशन जाहिर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारचे १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होत आहे. केंद्र सरकार एवढे दिवस अधिवेधन घेत आहे तर महाराष्ट्र सरकार का नाही ? असा प्रश्न करीत ‘याचा अर्थ हे सरकार पळकुटे आहे’, असा आरोप केला. एकदाही मंत्रालयात पाऊल न ठेवता राज्याचा कारभार चालविणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला आहे. अधिवेशन पूर्वसंध्येला चहापान व पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहणारा मुख्यमंत्री सुद्धा पहिलाच पाहिला आहे, असेही राणेंनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page