*💫सावंतवाडी दि.०५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ३६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात २८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सालईवाडा १, न्यू खासकील वाडा १, सावंतवाडी ४, लक्ष्मी नगर १, खासकील वाडा १ तर ग्रामीण भागात चौकुळ ४, वेत्ये २, माजगाव २, कुंभार्ली १, वेरले १, इन्सुली १, सांगेली २, कोलगाव १, बांदा ४, पाडलोस ८, मळगाव २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात २५७ रुग्ण सक्रिय आहेत.
