⚡वेंगुर्ले ता.२२-: कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव वेतोबा मंदिरात भाजप युवा नेते विशालजी परब यांनी सपत्नीक सौ. वेदिका परब यांच्यासह दर्शन घेत कोकणवासीयांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले.
यात्रेच्या निमित्ताने आयोजित या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. दर्शनानंतर विशालजी परब यांनी उपस्थित भाविक व स्थानिक नागरिकांशी संवाद साधत कोकणातील प्रत्येक नागरिक सुखी, समाधानी आणि आनंदी राहावा, तसेच समाजात ऐक्य, शांतता आणि प्रगती नांदावी अशी भावना व्यक्त केली.
या भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आरवली व परिसरातील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
यावेळी आरवलीचे सरपंच समीर कांबळी, सागर तीर्थ एकनाथ कुडव (माजी सरपंच), शिरोडा येथील मनोज उगवेकर (माजी सरपंच), आरवलीचे तातोबा कुडव (माजी सरपंच), मंदिर समिती सदस्य प्रसाद साळगावकर, किरण पालयेकर, मिलिंद साळगावकर व मयूर आरोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यात्रेनिमित्त आरवली नगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली होती.
