५७ कोटी रुपयांच्या नलपाणी योजनेवर नियुक्ती करण्यात आलेल्या तज्ञ भिसे यांची निवड नियमबाह्य…

बाबू कुडतरकर यांचा आरोप:त्या कामाचा अनुभव व माहिती नसताना अशी नियुक्ती करणे ही नगरपालिकेसाठी लज्जास्पद बाब..

⚡सावंतवाडी, ता.२२- : सावंतवाडी शहरातील ५७ कोटी रुपयांच्या नलपाणी योजनेवर तज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या भिसे यांची निवड नियमबाह्य असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केला आहे.

कुडतरकर म्हणाले की, संबंधित तज्ञाला आवश्यक त्या कामाचा अनुभव व माहिती नसताना अशी नियुक्ती करणे ही नगरपालिकेसाठी लज्जास्पद बाब आहे. यापूर्वी तज्ञ नेमण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र त्यानुसार करण्यात आलेली ही नेमणूक योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सक्षम व अनुभवी तज्ञाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे नलपाणी योजनेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत नगरपालिकेची पुढील भूमिका काय असेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page