Headlines

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार…

कुडाळमध्ये शनिवारी आकाश दर्शन व खागोलशास्त्र करिअर संधी;आतापर्यंत ३०० जणांनी केली नोंदणी..

कुडाळ : नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘चला कुडाळ घडवूया पर्व 3’ च्या माध्यमातून ‘आकाश दर्शन व खगोलशास्त्र करिअर संधी’ हा कुडाळ मधील विध्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी बॅरिस्टर नाथ पै मैदान, कुडाळेश्वर वाडी, कुडाळ येथे संध्याकाळी 7:00 वाजल्यापासून सुरु होणार आहे. सुमारे 300 विध्यार्थ्यानी सदर कार्यक्रमास नोंदणी केली आहे.
या कार्यक्रमात आकाश म्हणजे काय?त्याच प्रकारे भारतातील विविध आकाश शास्त्रज्ञ यांच्या बद्दल माहिती, तसेच इसरो, नासाला जाण्यासाठी कोणता अभ्यासक्रम घ्यावा लागेल, या संदर्भात परिपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
तसेच लेझर शोच्या माध्यमातून राशी नक्षत्र व आकाशातील विविध गोष्टी दाखवण्यात येणार आहे. विशेष आकर्षण म्हणजे दुर्बिणी मधून चंद्र व इतर आकाशातील तारे हे विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाबद्दल कुडाळ शहरात बरीच उत्सुकता आहे.

You cannot copy content of this page