Headlines

Global Maharashtra Breaking News

आरोस येथील पाईप लाईनसाठी खोदलेले चर बुजविले

मनसे आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांच्या इशाऱ्यानंतर कारवाई ⚡सावंतवाडी ता.२१सहदेव राऊळ-: आरोस येथे पाईपलाईनसाठी खोदलेले चर पावसाचे पाणी जाऊन बसल्याने आरोस गावात विद्याविहार इंग्लिश स्कूल नजीक गाड्यांचे अपघात होत होते, तसेच या भागातून एसटी वाहतुक करण्यास नकार येत होता त्यामुळे येथील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत होते. या विषयी मनसे आरोस विभाग प्रमुख…

Read More

मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग साधना महत्वाची

प्रा. वामन खोत:मालवण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा ⚡मालवण ता.२१-: आपल्या जीवनात योगाला फार मोठे स्थान असून व्यक्तिगत आयुष्यात सामाजिक, मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग साधना महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी या तीन सूत्राचा अवलंब करून आपले शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त बनवावे असे प्रतिपादन भंडारी ए. सो.कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वामन खोत यांनी येथे बोलताना केले….

Read More

सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा योग समितीचा कार्यक्रम संपन्न

जागतिक योगदिनाच्या पार्श्र्वभूमीवर दाखविण्यात आली योगा व प्राणायाम प्रात्यक्षिक ⚡सावंतवाडी ता.२१- : जागतिक योगदिनाच्या पार्श्र्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्हा योग समितीचा कार्यक्रम सावंतवाडी येथे कळसुलकर हायस्कुलच्या हॉल मध्ये घेण्यात आला. यावेळी योगा व प्राणायाम प्रात्यक्षिक करून दाखवली मार्गदर्शन करण्यात आले. जगातील २०० पेक्षा जास्त देशात २१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो….

Read More

सावंतवाडीतील जिल्हा कारागृहात बंदीवाणांसोबत योग दीन साजरा

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचा उपक्रम सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने आठवा आंतरराष्ट्रीय योगा दिन सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदिवानांसोबत साजरा केला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी सर्व बंदिवानांना योगासनाच्या प्रत्येक प्रात्यक्षिकासह त्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी कारागृहातील बंदीवानांना सर्वसंधी संचालन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन,…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालय व ५८ महाराष्ट्र बटालियन तर्फे योगा दिन साजरा

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी व एनएसएस विभाग आणि ५८ महाराष्ट्र बटालियन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी सकाळी मालवण बंदर जेटी येथे साजरा करण्यात आला. यावेळी बटालियनच्या जवानांसह प्राध्यापक, एनसीसी, एनएसएस विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत विविध योगा प्रात्यक्षिके सादर करून योगाभ्यासाचे महत्व पटवून देण्यात आले. मालवण बंदर जेटी येथे सकाळी…

Read More

शिवसेनेतर्फे नांदोस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

⚡मालवण ता.२१-: मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने नांदोस येथे दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना तालुका प्रमुख तथा माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पूढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दहावी मधील उत्तीर्ण विद्यार्थी समुध्दी श्रीकुष्ण गावडे, लिना विलास शिंदे, पुर्वा मनोज नांदोसकर, दिपिका सुरेश यादव, प्रथमेश…

Read More

शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे २५ रोजी आयोजन

⚡मालवण ता.२१-: करिअर गायडन्स आणि प्लेसमेन्ट सेल, स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण यांच्यावतीने दि. २५ जून रोजी सकाळी ११.३० वाजता सिंधुदुर्ग महाविद्यालयात निशुल्क “शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शासकीय नोकरी म्हणजे केवळ UPSC व MPSC असे नाही, केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांच्या विविध विभागा द्वारे व वेगवेगळ्या मंत्रालया अंतर्गत…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिमुकल्यांनी केली योगाची प्रात्यक्षिके

सावंतवाडी माठेवाडा येथील अंगणवाडीमध्ये योगा करताना छोटी बालके ⚡सावंतवाडी ता.२१-: शहरातील माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या छोट्या बालकांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाची प्रात्यक्षिके करून सर्वांचीच मने जिंकली महिला व बालकल्याण शहर विभागाच्या अंगणवाडी क्रमांक 66 मध्ये तीन वर्षावरील बालकानी योग दिनानिमित्त प्रात्यक्षिके केली या शाळेमध्ये…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये आठवा योगदिन साजरा

⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरपरिषद आणि सिंधुदुर्ग योग प्रसार संस्था सिंधुदुर्ग संचलित डॉ. वसुधाज योगा अॅण्ड फिटनेस अॅकॅडमी यांच्या सहयोगाने नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉलमध्ये आज आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Read More

सभागृहास शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव द्या

दिनेश हळदणकर यांची मागणी ⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सभागृहाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज‘ असून ते ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या नावासहीत पूर्ण आडनावसह देण्यात यावे अशाप्रकारचे निवेदन वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश हळदणकर यांनी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांना दिले आहे.

Read More
You cannot copy content of this page