Headlines

Global Maharashtra Breaking News

मसुरे येथील युवा समाजसेवक अभिषेक धुरी याचे मुंबई येथे निधन

⚡मालवण ता.०५-: मसुरे गड घेरा बाजार पेठ येथील रहिवाशी युवा समाजसेवक आणि साई कृपा मित्र मंडळ मसुरे बाजारपेठ मुंबई चे सदस्य, अभिषेक मोहन धुरी वय ४० वर्षे याचे सोमवारी रात्री उशिरा ठाणा मुंबई येथे त्याच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. मंगळवारी सकाळी ११ वाजता ठाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अभिषेक याचे…

Read More

शहरातील समस्यांबाबत माजी खासदार निलेश राणे मालवण नगरपरिषदेवर देणार धडक*

⚡मालवण ता.०५-: मालवण शहरातील गटार व व्हाळ्यांची सफाई न झाल्याने पावसाचे पाणी साचून मालवण शहर जलमय होत आहे. नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन फक्त कामाचा दिखाऊपणा यामुळेच शहारत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ठेकेदार काम करत नाही असे उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकण्याचे काम वेळोवेळी मुख्याधिकारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर गटार खोदाई व शहरातील इतर समस्यांबाबत प्रशासनाकडून…

Read More

*तारामुंबरी येथे घराची भिंत कोसळून पन्नास हजारांचे नुकसान*

⚡देवगड ता.०५-: तालुक्यात गेली काही दिवस अधून मधून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून सोमवारी सकाळी तारामुंबरी संतवाडा येथील स्नेहा मनोहर तारकर यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून रु ५०हजारांची हानी झाली आहे.यात कोणतीही जीवित हानी झाली नसून घराच्या भीतीचे नुकसान झाले आहे.या घरात एकटी ७० वर्षीय महिला रहात असून महसूल प्रशासन मार्फत तलाठी डी. बी.देशमुख यांनी रीतसर…

Read More

महिलेला वाचविणारे पोलीस दत्ता देसाई यांचा राष्ट्रवादीने केला सत्कार

⚡आंबोली ता.०५-: शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल सावंतवाडी राष्ट्रवादीच्यावतीन हवालदार दत्ता देसाई सत्कार केला. गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून एका झाडाच्या फांदीला पकडुन २५ मिनिटे होती. ही घटना कळताच आंबोली पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोचले. यावेळी शौर्य दाखवत हवालदार दत्ता देसाई यांनी…

Read More

9 जुलै पर्यंत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

नागरिकांना दक्षता घेण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांचे आवाहन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार दिनांक 9 जुलै पर्यंत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे.विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. संगणक, टीव्ही…

Read More

मालवण एसटी आगारातील लेखाकार उदय खरात यांचे आकस्मिक निधन

⚡मालवण ता.०५-: मालवण एसटी आगारातील आगार लेखाकार उदय उत्तम खरात (वय ३६ रा. सासवडे, कराड) यांचे मंगळवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. उदय खरात यांना पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याने एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालय प्रशासनाने उदय खरात यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. उदय खरात यांनी १२ वर्षे मालवण आगारात सेवा…

Read More

आचरे येथे ऑलिव्ह रिडले जातीच्या दोन कासवांना जीवदान देत सोडले समुद्रात

⚡मालवण ता.०५-: समुद्राच्या उधानावेळी समुद्राच्या लाटांमुळे आचरे समुद्र किनाऱ्यावर आलेल्या दोन ऑलिव्ह रिडले या कासवांना स्थानिकानी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले आचरा समुद्र किनारी आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्यान फेरफटका मारताना कासव संवर्धक श्री सुर्यकांत आबा धुरी यांना समुद्र किनारी पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत आलेल्या मासेमारी जाळ्याच्या गुंत्यात दोन कासव अडकून पडल्याचे निदर्शनास आले….

Read More

त्रिंबक येथे सामूहिक शेतीचा प्रयोग

बचत गटाच्या माध्यमातून केली श्री पद्धतीने लागवड ⚡मालवण ता.०५-: वाढत्या खतांच्या किंमतीमुळे आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे शेती परवडत नसल्याची ओरड मारली जात असल्याने पडीक क्षेत्रात होणारी वाढ लक्षात घेऊन त्रिंबक येथील महिलांनी एकत्र येत कषी विभागाच्या साहाय्याने श्री पद्धतीने शेती लागवड करून कृषी क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे त्रिंबक येथील ठाणेश्वर ग्रामसंघ महिला बचत गटाच्या…

Read More

नागवे येथील पशु लसीकरण शिबिराला प्रतिसाद

⚡कणकवली ता.०५-: गुरावर विविध आजारांचा प्रादुर्भाव होत असतो. यात काहीवेळा लवकर व योग्य उपचार न मिळल्यास गुरे दगावतात. शेतकऱ्यांनाही गुरांच्या उपचारासाठी मोठा खर्च होतो. यासाठी कणकवली पशुसंवर्धन विभागाच्यावतीने व फोंडाघाट येथील कै. राजाराम मराठे कृषी विद्यालयाच्या कृषी दुतांच्या सहकार्याने मोफत पशु लसीकरण शिबीर नुकतेच नागवे येथे घेण्यात आले. शिबिरात सरपंच नारायण आर्डेकर, डॉ. योगेश गोसावी,…

Read More

मालवण तेली समाज उन्नती मंडळाची त्रैमासिक सभा ९ रोजी

⚡मालवण ता.०५-: मालवण तेली समाज उन्नती मंडळाच्या कार्यकारी मंडळाची त्रैमासिक सभा शनिवार दि. ९ जुलै रोजी संध्याकाळी ३.३० वाजता पादुका मंदिर देऊळवाडा येथे राजन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More
You cannot copy content of this page