Headlines

Global Maharashtra Breaking News

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रखडले पगार ; ‘स्मार्ट’ एजन्सीवर कारवाईचे आदेश…

आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी वेधले लक्ष.. ⚡कुडाळ ता.२२-: आरोग्य कर्मचाऱ्याच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य समिती सदस्य रुपेश पावसकर यांनी आरोग्य समितीच्या सभेत प्रश्न विचारून लक्ष वेधले आणि चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर आवाज उठविला. त्याचाच परिणाम म्हणून आरोग्य समिती सभापतींनी ‘स्मार्ट’ एजन्सीवर कडक कारवाईचे आदेश दिले, असे रुपेश पावसकर…

Read Full News

युको बॅक उद्योजकाना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध…

सिद्दार्थ दास :उद्योजकांसोबत ‘उद्योगवृध्दी वार्तालाप’ कार्यक्रम.. ⚡कुडाळ ता.२२-: नवउद्योजकांना आपले नवीन उद्योग सुरु करण्यासाठी तसेच ज्या उद्योजकाना आपल्या उद्योगाचा विस्तार करायचा असेल, अशा सर्वाना युको बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदराने आणि तातडीने कर्ज पुरवठा करण्याचा आपला मानस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषत: पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी आपली बँक कटिबद्ध आहे, अशी प्रतिपादन युको बँकेचे असिस्टंट…

Read Full News

कर्जमाफीस पात्र नसलेली पीककर्जे मुदतीत भरा…

अन्यथा प्रोत्साहनपर लाभाला मुकावे लागेल:बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन.. ⚡बांदा ता.२३-: राज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यावर्षीची कर्जे कर्जमाफिस पात्र नसल्याने शेतकऱ्यांनी चालू वर्षातील वसुलपात्र पीककर्जाची मुदतीत परतफेड करावी, अन्यथा प्रोत्साहनपर लाभ योजनेपासून वंचित राहावे लागेल, असे आवाहन बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी…

Read Full News

पिग्मी एजंटांचे कमिशन पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करावा…

पिग्मी एजंटांची आम. निलेश राणे यांच्याकडे मागणी.. ⚡मालवण ता.२२-:पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या ३ टक्के कमिशनमध्ये कपात करून २.५० टक्के करण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन लक्ष वेधले. पिग्मी एजंटांचे कमिशन पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करणारे निवेदन आमदार निलेश राणे यांना पिग्मी एजंटांकडून देण्यात आले….

Read Full News

सत्ताधाऱ्यांनी २१ निविदा रद्द करून जनतेला खड्ड्यात घातले…

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा आरोप.. ⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरात पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेली विकासकामे आणि २१ निविदा प्रक्रिया सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर रद्द केल्या आहेत. केवळ ठेकेदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न असून, यामुळे आचरा रस्ता, मराठा मंडळ रस्ता, परबवाडी यांसह ११ प्रमुख रस्त्यांची कामे रखडली आहेत. जनतेला खड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवास करायला…

Read Full News

घोटगे येथे ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उत्साहात…

⚡दोडामार्ग ता.२२-: तालुक्यातील घोटगे येथे ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गुरुवार, दि. २१ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उभारण्यात आलेल्या या नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून अंगणवाडीतील बालकांना सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत.या उद्घाटन कार्यक्रमाला पंचायत समिती उपसभापती गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सदस्य संजय सातार्डेकर,…

Read Full News

वराड येथे २३ मे रोजी ‘सेवास्पर्श फाउंडेशन’तर्फे करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा…

⚡ओरोस ता २२-: दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नेमके काय करावे? असा यक्षप्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर उभा राहतो. याच प्रश्नाचे योग्य उत्तर व दिशा मिळवून देण्यासाठी ‘सेवास्पर्श फाउंडेशन’ यांच्या वतीने शनिवार २३ मे २०२६ रोजी संध्याकाळी ठीक ३ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हडपीवाडी – वराड येथील ‘नम्रता हॉल’ येथे…

Read Full News

प्रवेशकर्त्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसांची मुदतवाढ…

सावंतवाडी ता.२२- : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होत असताना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यातच शासकीय संकेतस्थळ संथगतीने चालत असल्याने फॉर्म भरण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत होत्या. ही तांत्रिक अडचण लक्षात घेत फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांमधून केली गेली. अखेर याची दखल घेत…

Read Full News

भाजपच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ प्रशिक्षण महाअभियाना’त दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण वर्ग..

चौके येथे २३ व २४ मे रोजी आयोजन; वैचारिक, संघटनात्मक, सोशल मीडिया व बूथ व्यवस्थापनावर मार्गदर्शन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता २१-:​भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत दोन दिवसीय ‘जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे’ आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण २३ आणि २४ मे २०२६ रोजी चौके (ता. मालवण) येथील ‘द नैनी ग्रँड…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा…

⚡ओरोस ता २१-: सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना संलग्नित सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा 2026-27 चे आयोजन 23 व 24 मे 2026 रोजी शिवाजीनगर, कणकवली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 7, 9, 11, 13, 15 व 17 वर्षाखालील खुली व मुली गटांचा समावेश आहे.प्रत्येक गटातून पहिल्या दोन स्पर्धकांना राज्य…

Read Full News

You cannot copy content of this page