युको बॅक उद्योजकाना सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध…

सिद्दार्थ दास :उद्योजकांसोबत ‘उद्योगवृध्दी वार्तालाप’ कार्यक्रम..

⚡कुडाळ ता.२२-: नवउद्योजकांना आपले नवीन उद्योग सुरु करण्यासाठी तसेच ज्या उद्योजकाना आपल्या उद्योगाचा विस्तार करायचा असेल, अशा सर्वाना युको बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदराने आणि तातडीने कर्ज पुरवठा करण्याचा आपला मानस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषत: पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी आपली बँक कटिबद्ध आहे, अशी प्रतिपादन युको बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर सिद्धार्थ दास यानी केले. कुडाळ एमआडिसी इंडस्ट्रीज असोसिएशन व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या उद्योगवृध्दी कार्यक्रमात ते बोलत होते.
कुडाळ एमआयडीसी विश्रमगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात युको बँकेच्या पणजी शाखेचे मुख्य प्रबंधक कुलभूषण दास यानी विविध उद्योगाना कशा प्रकारे अर्थसाहाय्य करता येईल त्याची सविस्तर माहिती दिली. उपस्थित असलेल्या अनेक उद्योजकांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनचे सर्वश्री नितीन पावसकर, निलेश धडाम,कुणाल ओरसकर, आनंद बांदिवडेकर, किशनलाल बिश्नोई, सौ.अमृता कदम,तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे राजन नाईक,इंडिया बांबू फोरमचे श्री शिल्पेश गंभीरे ,उद्योजक श्री सुरज तेंडुलकर, पी.के.परब, साईश मसके, गौरव पाटकर, भिवा परब, राहुल मानकर आदी उपस्थित होते.
मुख्य समन्वयक संतोष राणे यांनी आपल्या प्रास्ताविकातुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरच्या गाव तेथे उद्योजक या संकल्पनेचा आणि उद्योगवृध्दी वार्तालाप कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज अँन्ड अँग्रीकल्चरचे पब्लिक रिलेशन,प्रसारमाध्यमं आणि कम्युनिकेशन समितीचे को- चेअरमन व कुडाळ एम.आय डि.सी.इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यवाह अँड.नकुल पार्सॅकर यानी केला. शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ त्याच धर्तीवर ‘युको बँक आपल्या दारी’ हा उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात उभारी देण्यासाठी सुरू केलेला अभिनव उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून आपल्या सर्व उद्योजकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. युको बँकेचे अधिकारी आपल्या उद्योजकानां सहकार्य करत आहेत याबद्दल युको बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे अँड.पार्सॅकर यानी आभार मानले.

You cannot copy content of this page