Global Maharashtra Breaking News

कोकण विभागाचे नियोजित रिक्षा बंद आंदोलन स्थगित

⚡कणकवली ता.३१-: रिक्षा चालक मालक संघटनेच्या सर्व प्रलंबित मागण्या व आंदोलनाची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महासंघाच्या शिष्टमंडळास बोलवून सकारात्मक चर्चा केली व येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन रिक्षा चालक मालक संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे १ ऑगस्ट रोजी कोकण विभागाचे नियोजित रिक्षा बंद आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा…

Read More

राष्ट्रीय काँग्रेस करणार आदित्य ठाकरे यांचे स्वागत

सावंतवाडी प्रतिनिधीमहाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे सावंतवाडीत स्वागत करणार आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निष्ठा यात्रेदरम्यान सावंतवाडी येथे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वागत केले जाणार असल्याची माहिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली शहरामध्ये प्रवेश करतात त्यांचे काँग्रेसच्या वतीने जयप्रकाश चौका जवळ…

Read More

आदित्य ठाकरे यांची उद्याची सभा न भूतो, न भविष्यती ठरेल

तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना विश्वासात सावंतवाडीशिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उद्याच्या निष्ठा यात्रेनिमित्त सावंतवाडी गांधीचौक येथे होणारी सभा ही न भुतो न भविष्यती अशी ऐतिहासिक सभा होईल त्याचा दौरा शिवसैनिकांसाठी ऊर्जा देणारा ठरेल असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला. तर सकाळी बारा वाजता शहरातील चिटणीस नाका परिसरात सावंतवाडी तालुक्याच्या…

Read More

युवासेनेतर्फे होणार आदित्य ठाकरेंचे जल्लोषी स्वागत – हरी खोबरेकर

⚡मालवण ता.३१-: शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात निष्ठायात्रा काढणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दि. १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून मालवण- कुडाळ विधानसभा मतदार संघातील युवासेनेतर्फे आदित्य ठाकरे यांचे कुडाळ शिवसेना शाखा येथे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. सर्व शिवसैनिक शिवसेनेशी एकनिष्ठ व ठाकरे यांच्या सोबत असल्याचा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांना देण्यात येणार आहे…

Read More

आंतरमहाविद्यालयीन पखवाज वादन स्पर्धेत मसुरेचा रथराज तुरी प्रथम

⚡मालवण ता.३१-: मुंबई विद्यापीठ संलग्न, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पखवाज वादन स्पर्धेत मसुरे देऊळवाडा गावचा सुपुत्र व मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.रथराज तुरी या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी रथराज याला पखवाज विशारद गुरुवर्य सचिन कातवणकर यांचे मार्गदर्शन आणि वडील…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बंटी पाटील यांची घेतली भेट

⚡ओरोस ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिका-यांनी माजी संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची गगनबावडा येथे भेट घेतली. यावेळी सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आपण जिल्ह्यात येऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे सांगीतले. यावेळी अध्यक्ष म्हणून नियक्ती झाल्याबद्दल सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी इर्शाद शेख यांचा शाल व…

Read More

असरोंडी विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला दिले पोर्टेबल साऊंड सिस्टीम

मालवण (प्रतिनिधी) असरोंडी येथील असरोंडी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिर मधील सन २००९-१० च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेची गरज ओळखून पोर्टेबल साऊंड सिस्टीम शाळेला प्रदान केली. पोर्टेबल साऊंड सिस्टीम यंत्रणा शाळेच्या सहशालेय कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही गरज ओळखून असरोंडी माध्यमिक विद्यामंदिरच्या २००९- १० सालच्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी आदित्य सावंत, दयानंद कदम,…

Read More

कथा कथन करण्याच्या कौशल्याचे दिल्या टीप्स

सानेगुरुजी कथामालेचा उपक्रम मालवण (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा विशेष कार्यक्रम जि. प. प्राथमिक उर्दू शाळा, आचरे येथे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे सुरेश ठाकूर यांनी कथा कशा कथन कराव्यात याविषयीचे मार्गदर्शन मुलांना केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील मुलांनी ‘किराते कुराण’ पठण केले. त्यानंतर…

Read More

राज्यपालांविरोधात शिवसैनिकांच्या चले जाव च्या घोषणा

मालवण (प्रतिनिधी) चले जाव चले जाव… काळी टोपी चले जाव… मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध असो… अशा घोषणा देत आणि काळ्या टोप्या उडवत मालवण तालुका शिवसेनेतर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई शहरातून गुजराथी आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार…

Read More

वेंगुर्ले तेली समाज मंडळाच्यावतीने ७ ऑगस्ट रोजी सत्कार

तीन वर्षातील गुणवंतांचा करणार सत्कार ⚡वेंगुर्ला ता.३१-: सिधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा वेंगुर्ला तर्फे तालुक्यातील मागील २ वर्षातील आणि चालु वर्षातील दहावी, बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ७ ऑगस्ट रोजी तुळस सरकारी रुग्णालयाजवळील शशिकांत तेली यांच्या निवासस्थानी सायं.४ वा. आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा जास्त गुण आहेत…

Read More
You cannot copy content of this page