सावंतवाडीत सुरू असलेल्या बेकायदा धंद्यांचा उद्या होणार पर्दाफाश…

मटका ,जुगार व्यवसायामागच्या गॉडफादरचे नाव होणार उघड;माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या पत्रकार परिषदेकडे शहरवासीयांचे लक्ष..

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडीत सुरू असलेला मटका ,व जुगार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा पर्दाफाश उद्या माजी नगराध्यक्ष संजू परब करणार आहेत . राजरोस सुरू असलेल्या या बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलीस गांधारीच्या भूमिकेत वावरत असल्याने उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका परब मांडणार असल्याने त्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

सावंतवाडी शहरात सध्या मटका व जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून या अवैध धंद्यामुळे युवा पिढी याच्या आहारी गेली आहे अनेक तरुण आज मटक्याच्या मागे धावतात त्यामुळे त्यांचा शिक्षणावर देखील परिणाम होत आहे. अनेक पालकांनी देखील संजू परब यांचं लक्ष वेधलं मटका बंद करण्याची मागणी केल्याने संजू परब यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून कोणत्याही परिस्थितीत शहरात मटका व जुगार बंद झाले पाहिजे यासाठी संजू परब यांनी याआधी देखील आवाज उठवला होता मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने संजू परब आता उद्या पत्रकार परिषद घेऊन ती आपली अवैधनविरोधात पुढील भूमिका जाहीर करणार आहेत तसेच ते शहरात याबाबत अवैध धंद्यांमध्ये देखील कोणाचा हात आहे याचा देखील ते खुलासा करणार आहे.

You cannot copy content of this page