⚡वेंगुर्ला ता.०९-: लोकराज्य मंचच्यावतीने महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंच मुख्यपमुख डॉ.श्रीनिवास गावडे योनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. गाव समृद्ध होण्याकरता कार्यकर्त्यांनी काम करावे असे प्रतिपादन श्री.गावडे यांनी केले.
यावेळी प्रास्ताविक मंच सचिव राजेश परब व आभार मंच शिक्षण उपप्रमुख निता कार्डोज यांनी मानले. यावेळी मंच उपप्रमुख शेखर चोपडेकर, मधुसुदन मेस्त्री, निहाल शेख आदी उपस्थित होते.
