⚡वेंगुर्ला ता.०९-: सन २०१५ ते २०१९ मधील महात्मा ज्योतिराव फुले २ लाखावरील शेतक-यांना कर्जमाफीचा निर्णय मिळत नसल्यामुळे तसेच शिवाजी छत्रपती कर्जमुक्ती योजनेमध्ये शेतकरी अद्यापपर्यंत वंचित असून त्याचप्रमाणे खावटी अल्पभुधारक व मध्यम मुदत व पिक विम्या संदर्भात सिधुदुर्गातील आंबा, काजू, सुपारी, भात पीक घेणा-या शेतक-यांनी १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तशाप्रकारचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी सिधुदुर्ग यांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, गेले सात ते आठ महिने कर्जमाफी संदर्भात अनेकवेळा उपोशण आणि निवेदने आंदालने करुन सुद्धा शेतक-यांचा शासनस्तरावर शेतक-यांचा विचार केला जात नाही. तसेच शेतक-यांचा सातबारा कोराही होत नाही. दि.२७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करुन सुद्धा एकही लोकनेते किवा लोकप्रतिनिधी शेतक-यांच्या विचारपूस करण्यासाठी आला नाही. आम्हा शेतक-यांचा निर्णय होत नसल्यामुळे आणि अनेक मंत्र्यांना निवेदने देऊनही न्याय मिळत नसल्याने सिधुदुर्गातील शेतकरी एका ताकदीने संघटीत होऊन १७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहेत. या मोर्चात शेतकरी शेतीची अवजारे घेऊन सहभागी होणार आहेत. तर येणा-या सर्व आगामी निवडणुकांवर शेतक-यांचा बहिष्कार राहणार असल्याचेही निवेदनात नमुद केले आहे.
शेतक-यांनी दिलेले हे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयकृष्ण फड यांनी स्वीकारले. यावेळी आंबा, काजू शेतकरी संघटनेचे सदसय शामसुंदर राय, जयवंत सावंत, भाई धर्णे, सूर्यकांत परब, विद्याधर माळकर, अशोक सावंत, मेघःश्याम भगत, सुधीर परब यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
