Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियान

18 वर्षावरील सर्व महिलांची होणार मोफत आरोग्य तपासणी ⚡कणकवली ता.१०-: माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना अंतर्गत कणकवली शहरामध्ये दिनांक 10 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीमध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळात 18 वर्षावरील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेमध्ये, हिमोग्लोबिन रक्तदाब, मधुमेह, वजन ,…

Read More

पावसामुळे भात कापणी लांबणीवर

दोन दिवस पाऊस पडल्यास लोंबी गळून पडण्याची शेतकऱ्यांत भीती ⚡बांदा ता.१०-: दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरूवात झालेल्या परतीच्या पावसामुळे परिपक्व झालेली भात कापणी लांबणीवर पडली आहे. पुढील दोन दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर कापणीयोग्य झालेल्या भात पिकाचे मोठे नुकसान होण्याच्या भितीने शेतकरी चिंतेत पडला आहे. सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती पिकवली जाते. परंतु सध्याच्या वातावरणातील बदलामुळे…

Read More

बांदा केंद्रशाळेला निवृत्त प्रा प्रकाश पाणदरे यांच्याकडून १२ हजार रुपयांचे क्रीडा साहित्य

बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेला सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश पाणदरे यांनी १२ हजार रुपये किमतीचे खेळाचे साहित्य सुपूर्द केले. यापूर्वी त्यांनी २५ हजार रुपये देणगी देत सावित्रीबाई दत्तक योजनेतून ८ मुलींना दत्तक घेतले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीने आभार व्यक्त केले.प्राथमिक शाळेला खेळाच्या साहित्याची गरज होती. ही गरज ओळखून श्री पाणदरे…

Read More

अवैध धंदे बंद करून सावंतवाडीची अस्मिता जपा

सर्वच पक्षांनी एकत्र येण्याची गरजमाजी नगराध्यक्ष संजू परब यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडीची अस्मिता जपण्यासाठी सावंतवाडीतील अवैद्य धंदे बंद झाले पाहिजेत. अन्यथा सावंतवाडीच्या अस्मितेला एक प्रकारे कलंक लागू शकतो. त्यामुळे शहरातील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा

सर्वोत्तम इ पेमेंट उपक्रमासाठी एफ सी बी ए पुरस्कार जाहीर ⚡ओरोस ता.१०-: देशातील सहकारी बँकिंग संस्थांचे आर्थिक मूल्यमापन करून त्यांच्या वार्षिक कामगिरीच्या आधारे गुणवत्ता मानांकन ठरवणारी संस्था नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य इंग्रजी मासिक Banking Frontiers यांच्यामार्फत बँकिंग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांचा गौरव करण्यात येतो यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

मळेवाड कोंडूरे गावचे उपसरपंच हेमंत मराठे यांना पितृशोक…

सावंतवाडी : मळेवाड गावचे रहिवासी आणि प्रसिध्द ज्योतिषी रमाकांत सदाशिव मराठे (८४) यांचे रविवारी मध्यरात्री दुःखद निधन झाले. मळेवाड कोंडूरे गावचे उप सरपंच तथा पत्रकार हेमंत मराठे यांचे ते वडील होत.रमाकांत मराठे हे पंचक्रोशी आणि गोवा येथे विख्यात ज्योतिषी म्हणून प्रसिध्द होते. तसेच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. सुरुवातीच्या काळात मराठे हे गोवा येथे महसूल…

Read More

सावंतवाडीत नरकासुर स्पर्धा…

शिवतेज मित्र मंडळाचे आयोजन;सलग सातव्या वर्षी आयोजन ⚡सावंतवाडी ता.१०-: शिवतेज मित्र मंडळ सावंतवाडी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारे मंडळ गेले सहा वर्ष नरकासू स्पर्धेचे आयोजन करत आहे. यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष असून रविवारी दि. 23 ऑक्टोबर रोजी मोती तलावाच्या काठावर श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी ग्रंथालयाच्या समोरील जागेत रात्री ठीक ९ वाजता भव्य खुले गटांमध्ये नरकासुर…

Read More

सिध्देश पांगम यांच्यावर भाजप ओबीसी सेलची जबाबदारी

आ नितेश राणे यांनी दिले नियुक्तीपत्र ⚡दोडामार्ग ता.१०-: सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले भेडशी येथील भाजपचे युवा कार्यकर्ते सिद्देश मोहन पांगम यांची भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यकारीणीत निवड करत त्यांची तालुका ओबीसी सेलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पांगम यांना हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबाबत भेडशीतील युवाईत…

Read More

वैभववाडी येथे १० आॅक्टोबर रोजी सहकारी संस्था सक्षमीकरणा बाबत चर्चासत्र

जिल्हा बँक कर्जाची १०० टक्के परतफेड करणाऱ्या संस्थाचा होणार गौरव;आमदार नितेश राणे, अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांची प्रमुख उपस्थिती ⚡वैभववाडी ता.१० संजय शेळके-: जिल्हा बँक कर्जाची १०० टक्के पूर्ण फेड केलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे अभिनंदन करण्यासाठी सोमवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता येथील सुवर्णा मंगल कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले…

Read More

गणित संबोध परीक्षेत नूतन विद्यालय कळणेचा 100% निकाल

⚡दोडामार्ग ता.१०-: ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत नूतन विद्यालय कळणे प्रशालेने घवघवीत यश मिळवले. इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मधील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100% लागला.त्यांना गणित विषय शिक्षक प्रसाद गोसावी व उमेश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्राचार्य एम. डी. देसाई, संस्थापदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,…

Read More
You cannot copy content of this page