सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा मुंबईत शुभारंभ

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सिंधुदुर्गच्या सुपुत्रांनी स्थापन केली कंपनी

⚡कणकवली ता १३-: सिंधुदुर्गातील मुंबईस्थित सुपुत्रांनी एकत्र येऊन
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. त्याचा शुभारंभ मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सिंधुदुर्गच्या सुपुत्रांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

कणकवली तालुक्यातील
कळसुलीचे सुपुत्र हनुमंत सावंत, सुहास आडीवरेकर, श्रीकृष्ण परब, दीपक म्हसकर, मिलिंद प्रभू हे या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीच्या माध्यमातून कॉम्प्रेसड बायो गॅस निर्मिती, नॅपीअर गवत उत्पादन, डेअरी, काजू प्रक्रिया उद्योजक, कृषी पर्यटन, तलावात बोटींग क्लब, फिशिंग क्लब, स्कूबा डायविंग असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे हा य मागचा उद्देश असल्याचे हनुमंत सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी आम. प्रसाद लाड, आम. संजय शिरसाट यांच्यासह कंपनीचे संचालक आणि सिंधुदुर्गवासीय चाकरमानी उपस्थित होते.

You cannot copy content of this page