वेत्ये ग्रामपंचायत निवडणूकीत रंगत : मतदारांचा मिळतो वाढता कौल
⚡सावंतवाडी ता.१३-: वेत्ये ग्रामपंचायत निवडणूकीत मोठी रंगत आली असून येथे सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेले युवा नेतृत्व तथा युवा सेनेचे समन्वयक गुणाजी गावडे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे गावातील युवा मंडळी त्यांच्या पाठीशी असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.गुणाजी गावडे हे नेतृत्व सामाजिक कार्यातून घडले आहे गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर राहून संकटात कुठलाही दूजाभाव न करता ते सर्वांसोबत खंबीर उभे राहत आले आहे. गावातील युवकांना एकत्रित करून नवनवीन उपक्रम राबवण्यावर त्याने आजपर्यंत भर दिला आहे क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून गावातील युवकांना त्याने नेहमीच हातभार दिला आहे गावाचे नाव या माध्यमातून त्यांनी दूरवर पोहोचवले.
राजकारणात काम करत असताना गावचा उपसरपंच या नात्याने त्याने अनेक विकास कामे केली आहेत अडलेल्या नडलेल्यांना त्यांनी नेहमीच आर्थिक सहकार्य केले आहे गावात रस्ता पाणी वीज या मूलभूत गरजेबरोबरच अन्य विकास कामे त्यांनी जिल्हा परिवर्तन खेचून आणली आहेत या कामात त्यांना नेहमीच गावकऱ्यांची साथ राहिली आहे आज याच त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर गावातील युवा पिढी बरोबरच जाणते मंडळ ही त्यांच्या बाजूने आहे निवडणुकीचा विचार करता या ठिकाणी दुरंगी लढत होत आहे दोन्ही बाजूने कडवी लढत असली तरी युवा नेतृत्व म्हणून गुणाजी गावडे यांना वाढता पाठिंबा आहे मात्र असे असले तरी हरळून न जाता सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी घरोघरी प्रचारात आघाडी घेतली आहे.
रात्रंदिवस युवा पिढी त्यांच्यासोबत मेहनत घेत असून वेत्ये गावात श्री गावडे नक्कीच करिष्मा घडवतील हे नक्की
