कणकवली अर्बन निधी बँकेची दिनदर्शिका प्रकाशीत

⚡कणकवली ता.१३-: कणकवली अर्बन निधी बँकेने सन 2023 साठीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ,कणकवली कॉलेज कणकवली येथे
कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्रकुमार चौगुले यांच्या हस्ते व पर्यवेक्षक प्रा .मंगलदास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .
या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.राजेंद्र कुमार चौगुले यांनी बँकेच्या वाटचाली बद्दल शुभेच्छा दिल्या,तसेच प्रा. कांबळे यांनी सर्व प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी यांना बँकेच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे व विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी कणकवली अर्बन निधी बँकेचे चेअरमन प्रा.हरिभाऊ भिसे ,संचालक तथा मुखकार्यकारी अधिकारी रंजन चव्हाण ,बँकेच्या कॅशिअर सौ. तांबे, सेल्स एक्सिकेटीव्ह सतीश मसुरकर तसेच सिनिअर ज्युनिअर कॉलेजचे सर्व प्राध्यापक
इतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page