Headlines

मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवणची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स. का. पाटील सिंधुदूर्ग कॉलेज मालवणच्या सभागृहामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या मालमत्तेचा विकास करून संस्थेची व्यवसायिक वाढ करण्यासाठी सुसज्ज असे डिपार्टमेंट व नवनवीन सेवा ग्राहक सभासदांना देण्याच्या धोरणात्मक निर्णयाने आणि अभ्यासपूर्ण चर्चेने संपन्न झाली.

या सभेसाठी उपस्थित प्रमुख पाहुणे एस.टी. महामंडळ मालवण डेपोचे व्यवस्थापक श्री. सुर्यवंशी यांच्या हस्ते सभासदांच्या गुणवान मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांमधून कट्टा शाखेच्या कर्मचारी श्रीमती स्वप्ना संजय मोर्वेकर यांना आदर्श कामगार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, तसेच संस्थेच्या आचरा शाखेतील कर्मचारी कु. भक्ती गणपत कानविंदे यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या जिल्हा संघात निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. पी. जी. पाटील यांचा या सभेत संस्थेचे अध्यक्ष श्री. तळवडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित सभासद, कर्मचारी यांनी धडाडीने निर्णय घेणारे संस्थेचे अध्यक्ष श्री. तळवडेकर यांचा सत्कार केला.

यावेळी श्री. सूर्यवंशी यांनी विचार मांडत संस्थेच्या विधायक कार्याचे तसेच कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी अध्यक्ष श्री. तळवडेकर यांनी विचार मांडत आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत या संस्थेचा विकासात्मक पाया मजबूत करण्यासाठी व संस्था विकासासाठी धैर्य धोरणे राबविणेसाठी सर्व सभासदांना वेळोवेळी मौलिक सूचना व सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सभासदांनी अध्यक्ष यांच्या तीन महिन्यांतील संस्थेच्या विकासात्मक कामगिरीचे विशेष कौतुक करून सभेत सर्वांनी अभिनंदन केले

या सभेत संस्थेचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रक, व्यापारी पत्रक, वार्षिक अंदाज पत्रक याच बरोबर संस्थेची मालवण शहरातील ७.५४ गुंठे जमीन विकसित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, उपाध्यक्ष मारूती सोनवडेकर, संस्थापक अध्यक्ष पी. जी. पाटील, संचालक प्रमोद मोहिते, प्रताप बागवे, विनोद सातार्डेकर, सुरज गवंडी, गंगाराम कोकरे, मंगेश परब, हनुमंत प्रभू, प्रशांत पारकर, विठ्ठल मालंडकर, हेमंत तळवडेकर, रूपेश खोबरेकर, सुप्रिया गांवकर, जयश्री हडकर, देवानंद लोकेगांवकर, कृष्णा गांवकर, जगन्नाथ गावडे, चंद्रकांत कुबल, सचिन गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, नागेश कदम, नागेश अटक, बाजेल फर्नांडीस आदी तसेच सभासद, कर्मचारी, पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page