Headlines

माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण…

⚡कुडाळ ता.०२-: माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड माणगाव या संस्थेची 75 वी रौप्य महोत्सवी वार्षिक आधीमंडळाची सभा माणगाव त्रिमूर्ती हॉल येथे पार पडली

माणगाव विभाग विविध सेवा सहकारी सोसायटी या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना भेटवस्तू म्हणून दोन घमाले, एक फावडे, सुपारीचे रोप व स्नेहभोजन देऊन गौरवण्यात आले. या सभेसाठी 750 सभासद उपस्थित होते. या रौप्य महोत्सवी वर्षात सोने तारण योजना, विविध कर्ज योजना अशा अनेक योजना शेतकरी सभासदांसाठी राबवून या सेवा सहकारी सोसायटीचा फायदा करून देत संस्थेची वार्षिक उलाढाल ही उच्च स्तरापर्यंत नेण्याचा मानस संचालकांच्या वतीने ठेवण्यात आला या सर्व योजनांसाठी सर्व सभासदांनी संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अवि राणे यांनी केले संस्थेच्या या कार्याबद्दल तसेच 85% कर्ज वसुली केल्याबद्दल आणि पारदर्शक अहवाल सादर केल्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे श्री सगुण धुरी व सर्व सभासदांनी कौतुक केले.

यावेळी संस्थेच्या अकस्मिक निधन झालेल्या विद्यमान संचालकांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन शंकर उर्फ अवी राणे, व्हाईस चेअरमन सिताराम कालवणकर, संचालक रामचंद्र धुरी, हरी कुडतरकर, भिकाजी उर्फ बापू बागवे, पांडुरंग परब, सखाराम गोसावी, नारायण कदम, महादेव गावडे, सौ अश्विनी माडगूत, श्रीमती रत्नप्रभा तेली, संस्थेचे सचिव केशव माळकर, व संस्थेचे सर्व कर्मचारी रुंद उपस्थित होते.

You cannot copy content of this page