Headlines

Global Maharashtra Breaking News

*_बेकायदा दारू वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर पथकाची कारवाई…

सावंतवाडीतील युवक ताब्यात;२७ लाख ५७ हजार ६०० रूपये मुद्देमाल जप्त बांदागोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने ट्रक मधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने गगनबावडा येथे कारवाई करत १८ लाख ५७ हजार ६०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण २७ लाख ५७ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक अक्षय अशोक शिरवणकर…

Read More

मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर टोल वसुली करू देणार नाही

परशुराम उपरकर;सर्व पक्षीयांनी आंदोलनात सहभागी व्हावे ⚡कणकवली ता.०९-:ओसरगाव येथील टोलनाक्यावरून टोल वसुली करण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. मात्र सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना सवलत तसेच इतर ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. त्या पूर्ण होत नाहीत तोवर टोल वसुली करू देणार नाही, असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे. तसेच सर्व…

Read More

जिल्ह्यात शौचालय दिनानिमित्त १९ नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रम

जिल्हा परिषद प्रशासक प्रजित नायर यांची माहिती ओरोस ता.०९ जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्हयांतील गावे सतत हागणदारीमुक्त रहावी हे ध्येय पुढे ठेवून 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय बाधकाम, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सुविधा निर्माण करणे तसेच प्लॉस्टिक प्रक्रिया युनिट व मैला…

Read More

लाठीकाठीत सिंधुदुर्ग ला दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य पदके

⚡ओरोस ता.०९-: ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन तर्फे शिर्डी, अहमदनगर येथे झालेल्या 19 व्या राज्यस्तरीय सिलंबम ( लाठी-काठी ) स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम असोसिएशन सिंधुदुर्ग ने उत्कृष्ट कामगिरी बजावत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य पदकाची कमाई केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सिलंबम खेळ प्रकारात एकाच वेळी खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य व…

Read More

बांद्यात श्री विठ्ठल मंदिर काकड आरतीची सांगता

⚡बांदा ता.०९-: बांदा य़ेथिल श्री विठ्ठल मंदिरात दिवाळी पाडव्यापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज सुरु असलेल्या काकड आरती सोहऴ्याची मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात सांगता झाली. या सांगता सोहळ्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते.दररोज पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात भूपाळी गायन करुन हा सोहळा आरंभ होतो. मग तुपात भिजवीलेल्या काकडा ज्योतीने श्री विठ्ठल रखुमाईला ओवाळले जाते. त्यानंतर…

Read More

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू करूया

ब्रगेडियर सुधीर सावंत;मालवण येथे बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन मालवण (प्रतिनिधी) राज्यात वसंतदादा पाटील यांच्यानंतर जनतेसाठी झटणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली बाळासाहेबांची शिवसेना हे नवीन पर्व आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून चांगले काम करून उज्वल भविष्य निर्माण करूया, सिंधुदुर्गच्या विकासासाठी झटूया असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मालवण येथे…

Read More

सलग ५ व्या वर्षी “हे चांदणे फुलांनी…” मैफिलीला रसिकांचा उदंड प्रतिसाद…

सावंतवाडी: जिल्ह्यातील कला व सांस्कृतिक चळवळीमध्ये नेहमीच अग्रेसर असलेले श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आयोजित दीपकभाई केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी नगरपरिषद प्रस्तुत सलग पाचव्या वर्षी श्री निलेश मेस्त्री निर्मिती व संकल्पनेतून खास त्रिपुरारी पौर्णिमेनिम्मित आयोजित करण्यात आलेल्या “हे चांदणे फुलांनी.. जुन्या-नव्या हिंदी व मराठी गीतांचा सदाबहार नजराणा व नृत्याविष्कार” या मैफिलीने उपस्थित रसिकांची…

Read More

गावोगावी निवडणुकांचं धुमशान,

७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, जनतेतून सरपंचांची निवड ⚡मुंबई दि.०९-: राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील ७७५१ गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार निवडणुकीची नोटीस जारी करतील. १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर…

Read More

आंगणेवाडीतील प्रमुख रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी ११ कोटींचा निधी मंजूर

भराडीदेवी मंदिर परिसराचा लवकरच कायापालट होणार;पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा निर्णय ⚡सिंधुदुर्ग ता.०९-: नवसाला पावणाऱ्या व कोकणातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी येथील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय घेतला. तसेच, या…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस किरण ठुबरे याचा शिंदे गटात प्रवेश

प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे ⚡वेंगुर्ला ता.०९-: राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस श्री किरण ठुबरे याचा बाळासाहेबाची शिवसेना पक्षात आज शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर याच्या उपस्थितीत प्रवेश केला.या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात…

Read More
You cannot copy content of this page