कास परिसरातील नेटवर्कची समस्या तात्काळ सोडवा

सरपंच प्रवीण पंडित : बीएसएनएल ग्राहकांना अखंडित सेवेसाठी प्रयत्न करा

⚡सावंतवाडी ता.०५-: भारत संचार निगम लिमिटेडच्या कास येथील टॉवर परिसरात वारंवार नेटवर्कच्या समस्येमुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कास गावासह परिसरातील बीएसएनएल ग्राहकांना अखंडित सेवा मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी कास सरपंच प्रवीण पंडित यांनी बीएसएनएलच्या अभियंत्यांकडे केली आहे. यावेळी विठ्ठल पंडित, समीर किनळेकर उपस्थित होते.
सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या बीएसएनएलच्या कास येथील टॉवरची कार्यक्षमता वाढविणे नितांत गरजेचे आहे. सातोसे, सातार्डा, मडुरा, पाडलोस, रोणापाल, शेर्ले परिसरात बीएसएनएल ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेऊन नेटवर्कची समस्या दूर करणे महत्त्वाचे आहे. एखाद्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास नेटवर्क समस्या उद्भवते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे तसेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसतो. या सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार करून बीएसएनएलने सदर समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी कास सरपंच प्रवीण पंडित यांनी भारत संचार निगम लिमिटेड सावंतवाडी अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page