सरपंच सुरेश उर्फ बाबु शेटवे यांनी केला कामाचा शुभारंभ
⚡आंबोली ता.०५-: चौकुळ ग्रामपंचायतच्या नळधारकाना शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून चौकुळ ग्रामपंचायत व जि. प. सिंधुदुर्गच्या वतीने जलजिवन मिशन अंतर्गत चौकुळ कुंभवडे व खडपडे या नळयोजना करणे या दोन कामाचा शुभारंभ सरपंच सुरेश उर्फ बाबु शेटवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच श्री. विजय गावडे, ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव गावडे , अभिजित मेस्त्री सोसायटी चेअरमन पांडुरंग गावडे संचालक सिताराम परब, माजी सैनिक वसंत गावडे, बाळकृष्ण गावडे, जेष्ठ ग्रामस्थ रामा गावडे, गोपाळ गावडे पोलीस पाटील परब, मायकल डिसोझा कुंभवडे ग्रामस्थ व खडपडे ग्रामस्थ इ. उपस्थित होते.
