शिरवंडे गावातील रस्ता वाहतूक योग्य करा

मनसे शिरवंडे विभाग अध्यक्ष सत्यवान घाडीगावकर यांनी वेधले लक्ष

⚡कणकवली ता.०५-: शिरवंडे गावातील शिरवंडे वडाचा नाका (शिवाजी पुतळा) पिंपळवाडी ते हिवाळे हायस्कूल येथील खराब रस्त्याबाबत तसेच शिरवंडे गावातील बाणेवाडी, बामणीयेवाडी ते ओवळीये कोलेरीवाडी येथील खराब रस्त्याची डागडुजी वा नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी मनसे शिरवंडे विभाग अध्यक्ष सत्यवान विश्राम घाडीगावकर यांनी केली आहे.

शिरवंडे पिंपळवाडी, येतयेवाडी, टेंबवाडी ग्रामस्थ गाव शिरवंडे ता. मालवण यांच्यावतीने मनसे शिरवंडे
विभाग अध्यक्ष सत्यवान विश्राम घाडीगावकर यांनी लक्ष वेधले आहे.
दोन्ही रस्ते ग्रामसडक योजने अंतर्गत झालेले असून आज सदर कामास दहा ते पंधरा वर्ष झालेली असून सदर रस्त्याची डागडुजी वा नूतनीकरण वा दुरुस्ती झालेली नाही. सदर रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरु आहे. रस्ता पूर्णतः खराब झाला असुन दोन्ही साइडपट्टी उखरून गेलेल्या आहेत. रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. रस्ता कमी व माती व खड़ी जास्त अशी अवस्था आहे. त्यामुळे लहान मुले व शाळेला जाणारी मुले यांच्या वाहतुकीचा धोका आहे. खडी, माती व खड्यांमुळे लहान वाहने नेण्यास धोका निर्माण झाला आहे. धूळ प्रदुषणामुळे रस्त्याच्या शेजारील घरांस धोका व व्यक्तींना / लहान मुलास आरोग्यास हानिकारक आहे. तरी योग्य ती उपाय योजना करून आमच्या जीवितांच्या आरोग्याचे व पर्यावरणाचे रक्षण करावे व सदर रस्ताची डागडुजी वा नुतनीकरण योग्य त्या यंत्रणे मार्फत करून मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page