तळवडे जनता विद्यालयात आयोजन;शिक्षणमंत्री दीपक केसरकर करणार उद्घाटन
⚡सावंतवाडी ता.०५-: सहयोग ग्राम विकास मंडळ गरड- माजगाव व ग्रामपंचायत तळवडे यांच्या सहकार्याने शेतकरी बागायतदार मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे याबाबतची माहिती प्रा.दिलीप गोडकर यांनी आज येथे दिली.
दरम्यान हा मेळावा रविवारी दि.८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री जनता विद्यालय तळवडे सावंतवाडीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आल्याचे ही गोडकर यांनी सांगितले.
यावेळी गोडकर म्हणाले की शेतकरी मेळा आयोजित करण्याचे उद्देश म्हणजे तरुण वर्ग आज शेतीकडे वळण्यासाठी हा आम्ही मेळावा घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान या मेळाव्याला शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही गोडकर यांनी केले.
