बांदा/प्रतिनिधी
बांदा मराठा समाजाच्या वतीने समाजाचे नाव उंचावणाऱ्या कर्तृत्ववान मराठा बांधवांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी बांदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर सावंत, भाजप युवा शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रांत उर्फ विकी कदम, तसेच ‘निर्भीड पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित पत्रकार निलेश मोरजकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बांदा मराठा समाज गेल्या दहा वर्षांपासून समाजबांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत आहे. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बांधवांचा गौरव करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याची परंपरा समाजाने जपली आहे.
समाजातील बांधवांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून बांदा मराठा समाजाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजातील गुणवंत व कर्तृत्ववान व्यक्तींचा अशा प्रकारे गौरव केल्याने समाजातील इतर बांधवांनाही प्रेरणा मिळते, असा सूर व्यक्त करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, माजी उपाध्यक्ष आनंद गवस, मुख्य प्रवर्तक गुरूनाथ सावंत, सचिव आनंद वसकर, माजी सचिव म. गो. सावंत, सल्लागार दिपक सावंत, सदस्य रत्नाकर आगलावे, महीला अध्यक्षा स्वाती सावंत उपस्थित होते.
मंडळाच्या पुढील कामकाजासाठी चर्चा करण्यात आली. यापुढे बांदा मराठा समाजाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी मंकरंद तोरसकर, भूषण सावंत, शामसुंदर धुरी, विनोद सावळ, विक्रांत कदम, वासुदेव भोगले, माजी खजिनदार राकेश परब, मिलिंद सावंत, सिताराम गावडे, लक्ष्मण पावसकर, लव रेडकर, लक्ष्मण सावंत, ज्ञानेश्वर सावंत, घनश्याम सावंत, राजेश सावंत, शामसुंदर चव्हाण, ऋषिकेश सावंत, हेमंत दाभोलकर, निलेश सावंत- पटेकर, राखी कळंगुटकर, लक्ष्मी सावंत, रिना मोरजकर, ममता सावंत, अवंती पंडीत, माधवी गाड आदि सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
कर्तृत्ववान मराठा बांधवांचा बांदा मराठा समाजातर्फे सन्मान…
