कणकवली येथील दानशूर व्यक्तिमत्त्व अपिशेठ गवाणकर यांचे निधन

⚡कणकवली ता.०५-: कणकवली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व सुधाकर उर्फ अपिशेठ गवाणकर यांचे गुरुवार ५ जानेवारी रोजी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
कणकवली पटवर्धन चौकातील गवाणकर हार्डवेअरचे मालक गौरव गवाणकर,सामाजिक कार्यकर्ते हर्षल उर्फ राजू गवाणकर यांचे ते वडील होत.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. अपी गवाणकर या नावाने ते कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात प्रसिद्ध होते. गरजूंना मदत करण्यात त्यांचा नेहमीच मदतीचा हात पुढे होता.
कुडाळदेशकर समाजासाठी त्यांनी काम केले होते. समाजासाठी काम करणार एक उत्तुग व्यक्तिमत्व हरपल्याची दुःखद प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजाचे कणकवली तालुकाध्यक्ष यासह अन्य अनेक पदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले होते. त्यांच्यावर सकाळी १० वाजता कणकवली येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित दोन मुली, सून, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.त्यांच्या अंत्यसंस्करासाठी सामजिक कार्यकर्ते,व्यापारी व विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

You cannot copy content of this page