मालवणच्या टोपीवाला हायस्कुलच्या स्नेहसंमेलनात ‘वनराई’चे नेपथ्य ठरले आकर्षण
⚡मालवण ता.१२-: मालवण येथील टोपीवाला हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात यावर्षी पर्यावरण पूरक नेपथ्य साकारण्यात आले. शाळेचे कलाशिक्षक बी. जी. सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नेपथ्यात रंगभूमीवर हिरव्या वनराईचे चित्र रेखाटत ‘झाडा लावा झाडे जगवा’ असा संदेश नेपथ्याच्या माध्यमातून हटके देण्यात आल्याने तो एक कौतुकाचा विषय बनला मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे स्नेहसंमेलन मामा वरेरकर…
