खनिकर्म व बंदरे विकास मंत्री
ना.दादासाहेब भुसे यांची ग्वाही
⚡कणकवली ता.१२-: राज्याचे खनिकर्म व बंदरे विकास मंत्री ना.दादासाहेब भुसे यांची जंजिरा या निवासस्थानी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली भेट घेत विजयदुर्ग बंदर विकास व अवैध वाळू विकास यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना नेते ब्रिगे.सुधीर सावंत यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,सुनील हरमलकर,संजय नरे , समाधान निकम उपस्थित होते.यावेळी विजयदुर्ग बंदर विकास व अवैध वाळू उपसा संदर्भात चर्चा झाली. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा खनिजकर्म व बंदर विकास मंत्री ना. दादासाहेब भुसे यांनी यावेळी दिली.
