Headlines

Global Maharashtra Breaking News

डिंगणे बांबरवाडी येथे उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीडिंगणे-बांबरवाडी येथील हरिदेव मंदिर येथे मंगळवार दिनांक २८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी सत्यनारायण महापूजा होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता पार्सेकर दशावतार मंडळ वेंगुर्लेचा ‘देवी मळगंगा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक नितीन सावंत तसेच बांबरवाडी, धनगरवाडी व डिंगणे ग्रामस्थ यांनी केले आहे.

Read More

भाजपा च्या वतीने ” मराठी राजभाषा दिनाचे ” औचित्य साधून जेष्ठ साहित्यिक अजीत राऊळ सर यांचा सत्कार

⚡वेंगुर्ले ता.२७-: कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ” मराठी राजभाषा दिन ” म्हणून साजरा केला जातो. मायमराठीचा गौरव करण्याचा , आपल्या मातृभाषे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याने जेष्ठ साहित्यिक अजीत राऊळ यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ नेते रामकृष्ण उर्फ बाळा सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . नोकरीच्या…

Read More

संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू

कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळण्यासाठी घेतला निर्णय ओरोस ता.२७-: आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृती बंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतनासाठी निधीची तरतूद करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात १ मार्च 2023 रोजी आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य संगणक परिचारक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच या मागणीसाठी 27…

Read More

मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा ३ रोजी मेळावा

⚡मालवण ता.२७-: मालवण शहर भाजप युवा मोर्चाचा मार्गदर्शन मेळावा शुक्रवार ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे हे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. रोजगाराच्या दिशा, शैक्षणिक धोरणातील बदल, यांसह संघटन वाढीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती भाजपा…

Read More

मराठी राजभाषा दिनी कणकवली
नगरवाचनालयात पुस्तकांचे प्रदर्शन

⚡कणकवली ता.२७-: मराठी राजभाषा गौरव दिन व कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त कणकवली नगरवाचनलायाच्या आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी वाचकांनी गर्दी केली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी वाचनालयाचे हनीफ पिरखान, माजी नगरसेवक गौतम खुडकर, वैजयंती करंदीकर,अच्युत देसाई, शिल्पा पिंडकुरवार,यश बाणे,जय वळंजू, ग्रंथपाल राजन ठाकूर, लिपीक स्नेहा चव्हाण, कर्मचारी अनिल मुसळे…

Read More

संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची जयंती आंबेडकर समाज मंदिर येथे साजरी

⚡सावंतवाडी ता.२७-: येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात नुकतीच संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची जयंती आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आले. प्रारंभी ॲड. शिवराम कांबळे, आर जी चौकेकर, मोहन जाधव कांता जाधव व संगीता मडूरकर यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. त्यानंतर ॲड. कांबळे यांनी व विनोद खोडके यांनी गाडगेबाबा यांचा…

Read More

सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेचा तिसरा वधू वर परिचय मेळावा उत्साहात

⚡सावंतवाडी ता.२७-: बौद्ध समाजातील अनुरूप वधू-वरांचे विवाह सुखकर व्हावेत या उदात्त हेतूने सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्थेने आयोजित केलेल्या तिसरा वधू वर परिचय मेळावा रविवारी सिंधुदुर्गनगरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमाचे अनौपचारिक उद्घाटन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून…

Read More

बावशी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे 2 मार्च रोजी रस्ता रोको आंदोलन

⚡कणकवली ता.२७-: विकासापासून वंचित राहिलेल्या बावशी गावच्या ४ कि.मी.रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. सध्या दुचाकी वाहन चालविण्यासही अडथळा ठरणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आला. त्यामुळे बावशी गावच्या तिरंगा ग्रामसंघातर्फे २ मार्च रोजी स. ८ वा. तोंडवली- बावशी फाटा येथे बावशी ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती बावशी…

Read More

मराठी भाषा दिनानिमित्त प्रा सुषमा मांजरेकर यांचा सत्कार

जिल्हा मराठी अध्यापक आणि दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ व दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फे मराठी भाषा समृद्धीसाठी अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल व मराठी अध्यापक संघाच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा गौरव करण्यात आला . यावेळी…

Read More

अनिष्ट प्रथा परंपरांची बंधने झुगारत स्त्रियांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे : सरिता पवार

⚡कणकवली ता.२७-: स्त्रीयांचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवं.आपल्या धर्म संस्कृतीनी लादलेली आणि पिढीजात जपलेली, सर्व अनिष्ठ चालिरितीची बंधने झुगारून स्त्रियांनी आपल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे. आणि आपल्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे यावे असे आवाहन कणकवली येथील राष्ट्र सेवा दलाच्या सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री सरिता पवार यांनी केले. राजापूर तालुक्यातील जुवाठी येथे विधवा महिलांना सोबत घेऊन…

Read More
You cannot copy content of this page