माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे वराड सोनवडे पुलाचे काम लवकर पूर्ण होईल

संतोष साटविलकर यांची माहिती

⚡मालवण ता.२३-: कर्ली खाडी पात्रात उभारणी होत असलेले वराड सोनवडे या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या काही महिन्यात गतिमान पद्धतीने सुरू आहे. सद्यस्थितीत पुलाच्या भरावांचे काम सुरू आहे. लवकरच या पुलाचे काम पूर्ण व्हावे यासाठी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी अधिकारी वर्गाला सूचना देऊन वेळोवेळी केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे.

पुलाबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ज्या ज्या मागण्या केल्या त्याला पाठिंबा देत निलेश राणे नेहमीच ग्रामस्थांच्या बाजूने राहिले. पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी निलेश राणे यांनी बांधकाम अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. त्याचाच परिणाम म्हणून पुलाच्या रखडलेल्या कामास गती मिळाली. आता पुलाच्या भरावांचे काम सुरू आहे. अशी माहिती जिप माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी दिली आहे.

फोटो : वराड सोनवडे पुलाच्या भरावाचे काम सध्या सुरू आहे

You cannot copy content of this page