⚡मालवण ता.२३-: देवबाग मोबारवाडी येथील रहिवासी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवबाग नं. १ च्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती करुणा विश्राम मळेकर (वय ९०) यांचे आज राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन निधन झाले.
श्रीमती करुणा मळेकर या मनमिळावू स्वभाव, परोपकारी वृत्ती यामुळे त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मालवण येथील भंडारी हायस्कुल मालवणचे प्रयोगशाळा सहाय्यक नंदकिशोर मळेकर यांच्या त्या मातोश्री होत.
