Headlines

Global Maharashtra Breaking News

नेरूर वाघचौडी येथे १८ रोजी जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा

⚡ओरोस ता.०३-: कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघचौडी येथील ओमकार मित्रमंडळ वाघचौडी यांच्यावतीने जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा २०२३ चे आयोजन शनिवार १८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता एम आय डी सी येथील विराज प्लास्टिक कंपनी जवळील वाघचौडी शूटिंग बॉल स्पर्धा मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ७००१ रुपये, द्वितीय क्रमांक ५००१ रुपये, तृतीय क्रमांक…

Read More

भव्य ओवरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे मोहिनी मडगावकर यांनी केले उद्घाटन

रॉयल किंग सावंतवाडी यांनी केले आहे आयोजन ⚡सावंतवाडी ता.०३-: रॉयल किंग सावंतवाडी आयोजित जिमखाना मैदान येथे भव्य ओवरआर्म क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा आज 3 ते 5 मार्च पर्यंत चालणार आहे. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ४४ हजारा रुपयांचे ठेवण्यात आले तर द्वितीय पारितोषिक २२ हजार…

Read More

हडी येथील शिवणवर्गाचा २५ महिलांनी घेतला लाभ

⚡मालवण ता.०२-: हडी शाळा नं. २ येथे सौ. आर्या गावकर यांच्या प्रयत्नातून शासन मान्य संस्थेतर्फे शिवणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २५ महिलांनी सहभाग घेतला. या शिवणक्लास प्रशिक्षणाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्यांना सौ. शिल्पा खोत व हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून सौ. दिव्या कोचरेकर यांनी काम…

Read More

वेळागर येथे १८२ जणांची आरोग्य तपासणी

⚡वेंगुर्ला ता.०२-: शिरोडा-वेळागरवाडी येथे वेळागर सर्वे नं.३९ नागरिक, जनसेवा प्रतिष्ठान व मातोश्री ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने कै.सौ.स्मिता जयप्रकाश चमणकर यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. फोटोओळी – वेळागर येथे रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Read More

कुंभवडे येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात महिला गंभीर

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल ⚡सावंतवाडी ता.०२-: काजु बागेत कामाला जातांना कुंभवडे येथील जंगलात गवारेड्याने हल्ल्या केल्याने महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार येथे सकाळी साडेआठ वाजता घडला.भारती भरत गावडे (40) रा. कुंभवडे असे तिचे नाव आहे. तिला उपचाराकरिता ओरस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कुंभवडे येथील भारती गावडे हिच्यासह अन्य काही महिला काजु बागेत कामासाठी जात…

Read More

रस्ता निधीचे प्रशासकीय मंजुरीचे पत्र प्राप्त झाल्याने तोंडवळी ग्रामस्थांचे उपोषण तात्पुरते स्थगित

⚡मालवण ता.०२-: तोंडवळी येथील सुरूबनातील६०० मीटर मार्गासह एकूण साडे पाच किमी रस्त्याच्या कामासाठी कालपासून तोंडवळीवासियांनी सुरुबनात उपोषण छेडले असताना आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी स्थानिक आमदार निधीतून दिलेल्या २० लाख रुपये निधीच्या शासकीय मंजूरीचे पत्र आज दुपारी उपोषणस्थळी सरपंच नेहा तोंडवळकर यांना दिल्यानंतर तोंडवळी वासियांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित…

Read More

शहरात पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढले…

सीसीटीव्ही कॅमेरात काही युवक कैद; पोलीस घेत आहेत शोध… सावंतवाडी : येथील शहरात पेट्रोल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना असून पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला आहे. काही युवक पेट्रोल चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या युवकांचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबतची अधिक माहिती आशी की सावंतवाडी…

Read More

अवकाश दर्शन” कार्यशाळा पोलीस परेड मैदान येथे संपन्न

सिंधुदुर्गनगरी, ता.०२-: विज्ञान दिनाचे औचित्य साधून पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे पाल्य यांना अवकाश व ग्रहांची ओळख व्हावी, तसेच *टेलिस्कोपव्दारे ते प्रत्यक्ष बघून त्यांची माहिती मिळावी. याकरीता पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली “अवकाश दर्शन” कार्यशाळा पोलीस परेड मैदान, ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे…

Read More

आम. नितेश राणे यांच्या लेखी आश्वासनानंतर बावशी महिला ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

पुढील दहा दिवसात रस्त्याच्या कामाला प्रारंभ करणार ⚡कणकवली ता.०२-: चाळण झालेल्या बावशी रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी आज गावातील महिलांनी आंदोलन छेडले. या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेऊन पुढील दहा दिवसात हा रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान दहा दिवसांनी रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला नाही तर पुन्हा…

Read More

ओसरगाव ग्रामदैवत लिंग माऊली देवालयाकडे जाणाऱ्या पुलाचे भूमिपूजन

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील ओसरगाव गावठणवाडी ते ग्रामदैवत लिंग माऊली देवालयाकडे जाणाऱ्या पुलाला 26 लाख निधी मंजूर झाला असून, या पुलाचे भूमिपूजन भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ओसरगाव सरपंच सौ.सुप्रिया कदम, उपसरपंच गुरुदास सावंत,माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे, संतोष कदम, भाजपा कार्यकर्ते दिगंबर परब, जमीनदार बाबु कुलकर्णी, सुभाष मेस्त्री,…

Read More
You cannot copy content of this page