गोवा बनावटीच्या दारु वाहतुक प्रकरणी संशयीतास जामीन मंजूर

⚡सावंतवाडी ता.२९-: लांजा तालुक्यातील कोर्ले येथे गोवा बनावटीच्या दारु वाहतुक प्रकरणी न्यायालयाने संशयिताची जामीवर मुक्तता केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याहून मुंबईचा दिशेने मद्याची अवैध वाहतूक करणा-या वाहकाला सापळा रचून पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क लांजाच्या पथकाला यश आले होते. ही कारवाई बुधवार २६ एप्रिल रोजी सकाळी ९.४५ वाजण्याचा सुमारास करण्यात आली होती व गुन्हा दाखल करून अटक करुन लांजा येथील मे. कोर्टासमोर रिमांड रिपोर्टसह हजर करुन त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी मागण्यात आली. त्यावेळी आरोपी तर्फे अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून पोलीस कोठडीची मागणी नाकारुन आरोपी यास न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.
आरोपी तर्फे न्यायालयात अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी जामीन अर्ज दाखल करुन, त्यावर युक्तीवाद केला. आरोपी तर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राहय मानून जामीनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण व अॅड. ओंकार कुलकर्णी यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page