⚡बांदा ता.२९-: गावातील अनेक रुग्णांना आवश्यक वेळी तात्काळ रक्तपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याची दखल घेत सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या सहयोगाने पाडलोस गाव व्हाॅटस्अप ग्रुप तर्फे सोमवार दि. 1 मे रोजी पाडलोस ग्रामपंचायत येथे सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे उद्घाटन सकाळी 8 वाजता करण्यात येणार आहे. गावातील नागरिकांना भविष्यात रुग्णालयात रक्ताची गरज भासल्यास इतरत्र फिरावे लागू नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे पाडलोस गाव व्हाॅटस्अप ग्रुपचे राजू शेटकर यांनी सांगितले. तसेच गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवावा असे आवाहनही श्री.शेटकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विश्राम गावडे (90672 20505) व राजू शेटकर (94212 65050) यांच्याशी संपर्क साधावा.
