अन्यथा वयाची ७० री पार केलेले सेवानिवृत्त शिक्षक पंचनाद निषेध आंदोलन करणार
⚡कणवकली ता.१८-: मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून २१/०६/२०२२ रोजी ८५ सेवानिवृत्त पदवीधर प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना निवडश्रेणी मंजूर करण्यात आली. त्याला आता १० महिन्यांचा कालावधी उलटला तरी एकाही शिक्षकाला प्रत्यक्ष लाभ देण्याबाबत अंतिम सुधारित निवृत्ती वेतन आदेश निघालेला नाही.एकूण ९४ शिक्षकांना अद्यापही लाभ मंजूर करण्यात येत नसल्याने २५/०५/२०२३ अखेरपर्यंत सर्व पात्र शिक्षकांचे…
