रोटरी आनंद मेळा अंतर्गत 20 मार्च रोजी मेरी आवाज सुनो स्पर्धा

⚡कणकवली ता.१६-: रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आयोजित रोटरी आनंद मेळा अंतर्गत सोमवार 20 मार्च रोजी मेरी आवाज सुनो स्पर्धा होणार आहे.

मेरी आवाज सुनो स्पर्धेत
एक हिंदी गीत व एक मराठी गीत सादर करावे. प्रत्येक गीतातील धृपद आणि एक कडव सादर करावे. प्रत्येक गीतासाठी 4 मिनिटांचा कालावधी मिळेल. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ऑडिशन होईल, ऑडिशनला सादर केलेलीच गिते अंतिम फेरीत सादर करावी. ऑडिशन मधून निवड झालेल्या स्पर्धकांनाच मोठ्या स्टेजवर सादरीकरण करता येईल.
स्पर्धेमध्ये एकूण तीन गट आहेत मात्र ऐनवेळी काही तांत्रिक अडचणीमुळे काही बदल करायचे असतील तर त्याचे सर्वस्वी अधिकार आयोजकांकडे असतील. असे मेरी आवाज सुनोच्या आयोजकांनी म्हटले आहे
या प्रमाणे मेरी आवाज सुनो स्पर्धेच्या अटी आणि शर्ती असून रिहर्सल/ऑडिशन सोमवार 20 मार्च सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत नगर वाचनालय, कणकवली येथे तर स्पर्धा अन बक्षीस समारंभ सायंकाळी 6 ते 10 वाजता होईल असेही आयोजकांच्यावतीने दादा कुडतरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page