मालवणात शासकीय कर्मचाऱ्यांनी छेडले थाळी बजाव आंदोलन
⚡मालवण ता.२०-: जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असताना ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ असा नारा देत आज मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर विविध शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी थाळी बजाव आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेकडो कर्मचाऱ्यांनी जोरदार थाळ्या वाजवत जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत सरकारचे लक्ष वेधले. मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर एकत्र येत…
