तरुणाला मारहाणप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

⚡मालवण ता.२३-: मनोरुग्ण तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या करण रमेश मसुरकर व प्रसाद रमेश मसुरकर (दोघेही रा. तोंडवळी वरची मुंजाची वाडी, ता. मालवण) या दोघांचीही मालवण न्यायालयाने साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती व सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. करण व प्रसाद मसुरकर यांच्या वतीने ऍड. हेमेंद्र गोवेकर यांनी काम पाहिले.

सदर गुन्हा दि. १९ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री घडला होता. याप्रकरणी तोंडवळी मुंजाचीवाडी येथील सौ. अर्पणा अरुण शिर्सेकर यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार अर्पणा शिर्सेकर यांचा मुलगा प्रसाद शिर्सेकर याला मानसिक आजार असून त्याने प्रसाद मसुरकर याची कळ काढल्याने प्रसाद मसुरकर याने त्याला चिव्याच्या काठीने मारहाण केली होती. तर करण मसुरकर याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या तक्रारीनुसार करण मसुरकर व प्रसाद मसुरकर या दोघांवर मालवण पोलीस स्थानकात भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत मालवण न्यायालयात सुनावणी होऊन या प्रकरणातील साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती तसेच सबळ पुराव्यांचा अभाव या कारणामुळे न्यायालयाने करण मसुरकर व प्रसाद मसुरकर या दोघांचीही निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी करण व प्रसाद मसुरकर यांच्यावतीने ऍड. हेमेंद्र गोवेकर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page