⚡मालवण ता.२३-: मालवण तालुक्यात भाजपने ठाकरे गट शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिंदर, बुधवळे, हडी येथील अनेकांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यात शिवउद्योग आघाडी मालवण तालुकाप्रमुख मंगेश गांवकर यांच्या सह बुधवळे सरपंच-संतोष पानवलकर, तसेच चिंदर ग्रामपंचायत सदस्य निलेश रेवडेकर, स्वरा पालकर, जान्हवी घाडी, हडी ग्रामपंचायत सदस्य- ऋषीकेश आस्वलकर यांनी प्रवेश केला
आचरा येथे सोमवारी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, संतोष कोदे,खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जेरॉन फर्नांडिस, जगदीश पांगे, संतोष गावकर, समीर बावकर, देवेंद्र हडकर, मुजफ्फर मुजावर, पळसंब सरपंच महेश वरक, अवधूत हळदणकर,, दीपक सुर्वे, विक्रांत नाईक, ललित चव्हाण, मनोज हडकर, बाबू कदम यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बुधवळे येथील दिपक येरम, ऋषीकेश येरम, किरण जोईल, कृष्णा साटम, वैभव वाघ, अनिल येरम, आप्पा येरम, अमर सरमळकर, अविनाश सरमळकर, प्रकाश जाधव, अनंत सरमळकर, समिर टेंबुलकर, समिर घागरे, चिंदर येथील अरूण घाडी, भाई तावडे, प्रमोद परब, सागर परब, प्रमोद घाडी, केशव घाडी, नंदकुमार घाडी, अनिल घाडी, दिपक घाडी, दादू घाडी, गिरीश पवार, निखिल घाडी, हर्षाली गोलतकर, भारती गोलतकर, श्रेया पालकर, वासुदेव घाडी, गणेश पाटणकर, आशिर्वाद तावडे, रमेश घाडी, सचिन जाधव, संजय घाडी, नारायण घाडी, हेंमत घाडी, गणेश पाताडे, सौरभ परब, मंदार घाडी, शेखर पालकर, शिशिर पालकर, विद्याधर पालकर, शंकर पालकर, मनिष सावंत, अनंत आचरेकर, गणेश पालकर, नित्यानंद मेस्री, राजन पालकर, आत्माराम पालकर, रविंद्र पालकर, हडी येथीलअनंत सुभेदार, तेजम शेडगे, अजिंक्य तोंडवळकर आदींनी भाजप प्रवेश केला.
यावेळी निलेश राणे यांनी ठाकरे मुख्यमंत्री असताना जिल्ह्याला निधी आला नाही. केवळ २० टक्के निधी दिला. ८० टक्के मुंबईला घेऊन गेले. मात्र आता जिल्ह्यावर तालुक्यावर अन्याय होणार नाही. तुम्ही व अनेकजण भाजपात प्रवेश करत आहेत. तुमचा मानसन्मान राखला जाईल असेही निलेश राणे म्हणाले
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी विचार मांडले.
