संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त
⚡मालवण ता.२८-: मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाणवाडीचा सुपुत्र तुषार दीपक पवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्याने संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त केली आहे.
तुषार पवार हा सामान्य कुटुंबातून असून त्याचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदी विक्री संघात काम करतात तर आई घरी शिवणकाम करते. अशा सामान्य कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्याने यु.पी.एस.सी. परीक्षेत उज्वल यश मिळवित मोठी मजला मारली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने त्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
