धाग्यांमधून साकारली स्वामी समर्थांची प्रतिमा

श्रेया चांदरकरच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक

⚡मालवण ता.२३-: कट्टा येथील वराडकर हायस्कुलची विद्यार्थिनी कु. श्रेया समीर चांदरकर हिने एक एक धागा जोडत श्री स्वामी समर्थ महाराजांची अप्रतिम अशी प्रतिमा साकारली आहे. यापूर्वी धाग्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा साकारून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविणाऱ्या श्रेया हिने धाग्यापासून साकारलेल्या स्वामी समर्थ्यांच्या कलाकृतीचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

श्रेया चांदरकर ही इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक व प्रसिद्ध रांगोळीकार समीर चांदरकर यांची कन्या आहे. वडिलांप्रमाणेच श्रेया हिला कलेची आवड असून विविध कलाकृती तिने साकारल्या आहेत. रंगीत धाग्यांपासून तिने साका रालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्या नंतर आता पुन्हा एकदा श्रेया हिने मेहनत घेत रंगीत धाग्यांपासून स्वामी समर्थांची प्रतिमा साकारली आहे. ही कलाकृती सर्वांच्या पसंतीस उतरली असून याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page